यंदाच्या वर्षी एक एेतिहासिक वास्तू साकारण्याचा योग आला. अवघ्या पाच दिवसात ही सर्व सजावट तयार करण्यात आली. त्याचे झाले असे सजावट काय करायची हे समजत नव्हते म्हणून विचार केला चला मार्केट ला जाऊ नवीन काही साहीत्य उपलब्ध आहे का ते बघू पण मार्केटला जात असताना वाटेत समोर शनिवार वाडा दिसला मग विचार केला की आपल्याला तो वाडा कसा साकारता येईल व ९ फुट रूंदी व ८ फुट उंची अशी घरातील मापे मोजून थोडा वेळ विचार करून लगेच सर्व सामग्री जमा केली लाकडाच्या पातळ फळ्या विकत घेतल्या त्या व्यवस्थितरित्या मापात कापून त्याचा सांगाडा तयार करून घेतला व नंतर प्रत्यक्षात त्याला साकारला. सर्व तयार झाल्यावर त्यावर पेंटींग करण्याची वेळ आली त्यासाठी दोन मित्रांची मदत घेतली व दगडी रंगाच्या प्रत्येक शेडींग मध्ये २ वेळा पेंटींग चे रंग मारून शनिवार वाडया ची प्रतिकृती तयार केली. त्यामध्ये वाड्याच्या दरवाजा मध्ये गणपती बाप्पा स्थानापन्न केले व दोन बुरूजा पुढे दोन गाैरी त्याच्या पुढे सर्व प्रकारचा फराळ व विविध फळे असा हा संपूर्ण देखावा असून ही देखावा सजावट पर्यावरणपुर्वक व परत वापर करण्यायोग्य पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे.अर्थात हे सगळं साकारणं ऐकट्याची गोष्ट नाही घरातल्या मंडळींचे व मित्र परीवाराचे सहकार्य मोलाचे आहे. गौरव राजेंद्र कदमबांडे सरदार कदमबांडे घराणे ८७९६९७९७६६ ९५९५९२१८३६
एेतिहासिक वास्तू शनिवार वाडा
Excited
0 Happy
0 In Love
0 Not Sure
0 Silly
0