मंगलमूर्तीच्या पालखीचे मोरगावकडे प्रस्थान!


Bybappaadmin

मंगलमूर्तीच्या पालखीचे मोरगावकडे प्रस्थान!


पुणे: भाद्रपदी यात्रेनिमित्त श्री मोरया गोसावी प्राप्त श्री मंगलमूर्तींच्या पालखीचे आज  चिंचवड येथून मोरगावसाठी प्रस्थान झाले. आज दुपारी बारा वाजता चिंचवडगावमधील मंगलमूर्ती वाड्यातून ढोल-ताशाच्या गजरात पालखीचे प्रस्थान झाले.

ही पालखी अडीचच्या सुमारास लिंक रस्त्यावरील देवघर सोसायटीत पोहचली. तेथे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पालखी पुण्याकडे रवाना झाली.

यावेळी मंगलमूर्ती वाडयामध्ये मुख्य विश्वस्त सुरेंद्र देव महाराज यांच्या शुभहस्ते पूजा-अर्चना करून मंगलमूर्ती समवेत महाराज श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात आले. त्या ठिकाणी समाधी समोर मंगलमूर्तीला ठेऊन दोघांची धूळभेट झाली. त्यानंतर मंदिरातील सात समाध्यांना प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखीचे प्रस्थान मोरगावच्या दिशेने झाले.

यावेळी मोरया गोसावी मंदिराचे विश्वस्त विश्राम देव, विश्वस्त विजय संपगावकर, सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी , पालिका ब प्रभाग अधिकारीदिलीप गावडे, नगरसेवक अनंत को-हाळे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, विरोधी पक्ष नेता विनोद नढे, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका आशा सुर्यवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान वाल्हेकर, माजी नगरसवेक राजाभाऊ गोलांडे, नगरसवेक गणेश लोंढे, माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते बाळा भोंडवे, सुरेश भोईर, शेखर बोरकर, नारायण लांडगे आदी उपस्थित होते.

यावेळी सुरेंद्र देव महाराज म्हणाले की, चिंचवड येथील मंगलमूर्ती व मोरगावच्या मयुरेश्वराच्या मुर्तीचे एकत्रित दर्शन हा यात्रेतील परमोच्च आनंदाचा क्षण असतो. 450 वर्षापासून मोरया गोसावी मंगलमूर्ती भाद्रपद वारीची यात्रा निघते. भाविकांचे श्रद्धास्थान श्री मोरया गोसावी आहेत. मोरया गोसावीना गणेश कुंडामध्ये प्राप्त झालेली श्री मंगलमुर्तीची ही भाद्रपद वारी आहे. वर्षातून दोन वेळा म्हणजे भाद्रपद व माघ महिन्यामध्ये गणेशचतुर्थीच्या दिवशी ही यात्रा निघते.

दहा दिवसाच्या कालावधीमध्ये भजन, नामस्मरण ,कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात भक्तिभावाने भाविक तल्लीन होतात. प्रसाद मिळवण्यासाठी भाविक प्रचंड गर्दी करतात. गणेशमुर्तीचे दर्शन डोळयात साठवून ठेवण्यासाठी तुडूंब गर्दी भाविकांची होते. हा सोहळा नयनमनोहर असतो.

पहिला मुक्काम पूणे येथे व दूसरा मुक्काम सासवड, व तिसरा मुक्काम मोरगाव येथे असतो. मोरगावच्या दिशेने पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर तेथील भाविक भक्तिभावाने फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये पूजा-अर्चना करतात. नंतर मंदिरामध्ये प्रवेश झाल्यानंतर मंगलमूर्तीची भेट होते. सहा दिवसांच्या मुक्कामानंतर पालखीचे पुन्हा परतीचा प्रवास चिंचवडच्या दिशेने होते.

You may also like

Baby Ganesha

HD Wallpapers

Aagman Pictures

Visarjan Pictures

Fantasy Ganesha

Official Wallpapers

About the author

bappaadmin administrator

    Leave a Reply