ठाणे: गणेश चतुर्थीच्या काळात गणेशाची अनेक रूपे भक्तांना पाहायला मिळतात. वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये विविध आकारात बाप्पा भक्तांच्या भेटीला येतात.
भारतातील सर्वात मोठी सोन्याची गणेश मूर्ती भांडूप येथील नेपच्युन मॅग्नेट मॉलमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. ही मूर्ती ५ फुटांची आहे.
मूर्तीची मूळ किंमत साडेसोळा लाख इतकी आहे. सध्या ही मूर्ती भाविकांसाठी आकर्षणाच केंद्र बनली आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने खास थायलंडमधून ही मूर्ती बनवून भारतात आणली आहे. ही मूर्ती बनविण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला.
ही मूर्ती एक शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. सोन्याची ही मूर्ती २ सप्टेंबरपर्यंत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.
What is your reaction?
Excited
0 Happy
0 In Love
0 Not Sure
0 Silly
0