मुंबई: मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या राजाच्या आरतीचा मान मोनिका मोरे या तरूणीला मिळाला आहे. आज संध्याकाळी मोरे आपल्या कुत्रिम हातांच्या सहाय्याने मुंबईच्या राजाची आरती कऱणार आहे.

11 जानेवारी 2014 रोजी घाटकोपर स्थानकावर ट्रेन पकडताना मोनिका मोरेला आपले हात गमवावे लागले होते. मात्र त्यानंतर ती त्यातून सावरली होती.

या घटनेनंतर मोनिका कोठेही खचून जाता पुन्हा जिद्दीने उभी राहिली त्यामुळे तीचे समाजाच्या विविध स्तरातून स्वागत झाले. त्यानंतर मोनिकाला केईएम हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी कृत्रिम हाक बसवल्याने ती पुन्हा एकदा ऊभी राहिली.

आता मोनिका आपल्या याच कृत्रिम हाताने गणेश गल्लीच्या राजाची आरती करणार आहे. यावेळी तिच्यावर उपचार करणारे केईएमच्या आर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप भोसले हेदेखील असणार आहेत. डॉ. भोसले यांनी मोनिकाला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही सक्षम केले आहे.